Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai latest news in Marathi: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. शहरातील वाढती बांधकामे, सार्वजनिक प्रकल्प आणि रस्त्यांवरुन बेलगाम धावणारी वाहने आणि त्यातच वाढती वाहनांची संख्याही प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरतं आहे. ज्यामुळे हवेची तर गुणवत्ता घसरण्यात दिल्लीनंतर मुंबई शहराचा क्रमांक लागतो.  मुंबईतील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असून, त्या तुलनेत मुंबईत रस्ते, पूल, पर्यायी मार्ग उभारणीचा वेग संथगती आहे. परिणामी मुंबईकरांना अनेक ठिकाणी  वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. 

नुकताच गुढीपाडाव्यानिमित्त मुंबईतील चार आरटीओमध्ये 1 ते 9 एप्रिल या कालावधी आठ हजारांहून अधिक वाहनांची नोंद झाली. सर्वाधिक चारचाकी वाहनांती नोंद मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये झाली. वाढत्या उष्णतेत गारेगार, आरामदायी प्रवास व्हा म्हणून चारचाकी वाहनांची मागणी वाढत चालली आहे. वाढती गाड्यांची संख्या वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्याचबरोब दिवसेंदिवस हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होऊन त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. 

वाहनांतून येणाऱ्या धूरांचा त्रास 

वाहतूक कोंडीमुळे  बराच वेळ एकाच ठिकाणी खोळंबलेल्या वाहनांतून धूर बाहेर पडतो आणि तो प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरत आहे. हा धूर मानवी आरोग्यासही घातक ठरत आहे. वाहनांच्या सर्वाधक हवा प्रदूषण होत आहे. वाहतूक कोंडीमध्ये खोळंबणाऱ्या वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूराचे प्रमाण अधिक असून त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावत आहे. यामुळे मानवी आरोग्यालाही धोका निर्माण  होत असल्याते मत पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केले आहे. 

वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ

सध्या मुंबईत वाहनांची संख्या 46 लाखांवर असून 2011-12 मध्ये हाच आकडा 20 लाख 28 हजार 500 इतका असेल. गेल्या दहा वर्षांत मुंबईतील वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. संख्या वाढत असताना पालिकेला वाहनांच्या संख्येसाठी पार्किंगची क्षमता मात्र वाढवली नाही. याशिवाय मुंबईकर अनेकदा त्यांच्या ठिकाणापासून दूर असलेल्या रस्त्यावर जागा मिळेल तिथे पार्क करतात. परिणामी या वाहतूककोंडीमुळे इतर चालकांसह पायी जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे. मुंबईत प्रतिकिमी रस्त्यावर 2300 वाहने असून वाहनांची संख्या गेल्या पाच वर्षात 25 टक्क्यांनी, तर 10 वर्षांच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. चेन्नईत 1762 प्रति किमी वाहने, कोलकाता 1283 वाहने, बेंगळुरु 1134 वाहने आणि दिल्ली 261 वाहने आहेत. 

Read More