Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून लेकाचे प्रयत्न, पण त्याच मुलाचा बापाने घेतला जीव

Mumbai Crime News:  वडिलांनीच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

वडिलांचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून लेकाचे प्रयत्न, पण त्याच मुलाचा बापाने घेतला जीव

Mumbai Crime News:  वडिलांना दारूचे व्यसन, ते सोडवण्यासाठी मुलगा आटोकाट प्रयत्न करत होता. वडिलांच्या व्यसनामुळं घरात पैशांची सतत तंगी असायची. त्यामुळं शिक्षणासोबतच त्याने पार्ट-टाइम जॉब करण्यास सुरुवात केली. वडिलांचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून प्रयत्न करणाऱ्या मुलाला जन्मदात्या पित्यानेच ठार केले आहे. मुंबईतील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तर, परिसरात मुलाच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाचा त्यांच्या जन्मदात्या वडिलांनीच खून केला आहे. दिनेश कुमार गुप्ता असं आरोपी वडिलांचे नाव असून त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. वाकोला पोलिसांनी आरोपीला अटक केले असून पोलीस कोठडी सुनावली आहे. गुप्ता हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहे. मात्र काम मिळवण्यासाठी ते मुंबईत आले आणि इथेच स्थायिक झाले. मुंबईतील वाकोला परिसरात दोन मुलं आणि पत्नीसह राहतात. 

दिनेश कुमार यांना रोज दारू पिण्याची सवय होते. ते दारू पिऊन घरी आल्यानंतर ते शिवीगाळ करायचे. याच कारणामुळं त्यांचा मुलगा अलोक व त्यांच्यात वाद व्हायचे. अलोकला त्यांची दारू पिण्याची सवय अजिबात आवडत नव्हती. घरातील आर्थिक परिस्थिती आधीच हलाकीची त्यात वडिलांचे व्यसन यामुळं अलोकने पार्ट टाइम जॉब करण्यास सुरुवात केली. 

रविवारी संध्याकाळी दिनेश कुमार संध्याकाळी घरी परतला ते दारूच्या नशेतच. त्यानंतर त्याचे व अलोकचे कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरू असताना रागाच्या भरातच दिनेशने एक चाकू आणला आणि अलोकच्या पोटात वार केले. या हल्ल्यात अलोक गंभीर जखमी झाला होता. अलोकच्या बहिणीने प्रीतीने आणि शेजाऱ्यांनी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून धावत आले. अलोकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांनी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले. 

अलोकला देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अलोकच्या मृत्यूनंतर शेजाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. तर, वाकोला पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. तर, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकूही ताब्यात घेण्यात आला आहे. दिनेश कुमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची मुलगी प्रिती हिनेच तक्रार दाखल केली होती. 

Read More