Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: पवई पोलीस ठाणे हद्दीत उच्चभ्रु लोकवस्तीत राहणाऱ्या ५५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. 

मालकाचा विश्वास मिळवून मोलकरणीने दाखवला खरा चेहरा; पवईतील उच्चभ्रू वस्तीत धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: काही दिवसांपूर्वीच दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपियन सी रोडवर एक हत्याकांड उघडकीस आले होते. नोकराने घरातील महिलेची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. ही घटना ताजी असतानाच पवई येथील उच्चभ्रू वस्तीतही असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका महिलेने तिच्याच मोलकरणीवर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित मोलकरणीस अटक केली आहे. 

पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत उच्चभ्रू लोकवस्तीत राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने 1 मार्च 2024 रोजी पोलिसांत मोलकरीबाबत तक्रार दाखल केली होती. घरकामाकरता त्यांनी एका तरुणीला नोकरीवर ठेवले होते. मात्र, घरात कोण नसताना त्या संधीचा फायदा घेऊन तिने चार महिन्यात थोडे थोडे करुन मोठ्या प्रमाणात सोने लंपास केले आहे. या सोन्याची किंमत जवळपास 2 कोटींच्या घरात आहे. मोलकरणीने इतकी मोठी रक्कम चोरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घर मालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही या घटनेचा लगोलग तपास करत आरोपी तरुणीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांच्या तरुणीने ४,२०९ ग्रॅम सोने, ४२५ ग्रॅम चांदिचे दागिने एकुण अंदाजे किंमत २,६९,५६,७१५/- रूपये व रोख रक्कम ६०,८००/- रूपये असे एकुण २,७०,१७,५१५/- रूपये किंमतींचे सोनं चोरले होते. आरोपी तरुणीने घरातील सदस्यांचा विश्वास संपादन करुन मागील चार महिन्यात थोडी थोडी करुन सोने चोरी केले होते. तरुणीने मोठी शक्कल लढवून घरातून हे सोने चोरी केले होते. घरातील लोकांना थोडा संशय आल्यानंतर त्यांनी तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. संशय पक्का झाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांत धाव घेत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. 

चोरीच्या गुन्ह्यात मोलकरणीचा सहभाग निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला व 24 तासांच्या आत तरुणीला ताब्यात घेतले. तिची चौकशी करुन तिच्याकडील सोने ताब्यात घएण्यात आले. तपास पथकाने तांत्रीक तपास व मानवी कौशल्याच्या वापर करून तरुणी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच तिला अटक केली आहे. 

Read More