Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Worli Hit And Run: अपघातावेळी कार कोण चालवत होतं?; वाचा आरोपी मिहीर शाहचा कबुलीजबाब

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन केस प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याने पोलिसांसमोर कबुलीजबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  

Worli Hit And Run: अपघातावेळी कार कोण चालवत होतं?; वाचा आरोपी मिहीर शाहचा कबुलीजबाब

Worli Hit And Run Case: वरळी येथील हिट अँड रन केस प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. पोलिसांनी आरोपी मिहीर शाह याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाह याने पोलिसांच्या चौकशीदरम्यान अपघाताच्यावेळी ड्रायव्हिंग सीटवर मीच होतो, अशी कबुली दिली आहे. 

अपघातानंतर आरोपी मिहीर शाह हा फरार झाला होता. मात्र पोलिसांना संशय आहे की, फरार होण्यापूर्वी त्याने दाढी केली होती. जेणेकरुन त्याला कोणी ओळखू शकणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या चौकशीत पोलिसांना जो टाइम सीक्वेंन्स मिळाला त्या आधारे पोलिस आरोपीची चौकशी करत आहे. पोलिसांनीही टाइमलाइन कन्फर्म केले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीनेही कबुल केलं आहे की अपघातावेळी तोच कार चालवत होता. 

आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबनुसार, घटना घडल्यानंतर तो खूप घाबरलेला होता. त्याचे वडिल राजेश शहा हे घटनास्थळावर पोहोचण्याआधीच तो तिथून फरार झाला होता. पोलिस सूत्रांनुसार, या प्रकरणी पोलिसांनी Culpable homicideचा केस दाखल केली आहे. प्राथमिक स्थितीत पोलिसांनी या प्रकरणात ड्रंक अँड ड्राइव्हची केस दाखल अद्याप दाखल करण्यात आलेली नाही. 

अपघातानंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर तो कुटुंबातील सदस्यांनाही न सांगता विरारमध्ये का राहत होता, यावरही पोलिस तपास करत आहेत. आज दुपारी मुख्य आरोपीला कोर्टात सादर करण्यात येणार आहेत. पोलिस पुढील तपासासाठी आरोपीची कस्टडीची मागणी केली जाणार आहे. पोलिसांनी आरोपीला विरार येथून अटक केली होती. 

बारवर कारवाई 

ज्या बारमध्ये बसून आरोपी मिहीर शाह याने पार्टी केली होती. मुंबई महानगर पालिकेने त्या बारवर आज कारवाई केली आहे. या बारचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार आहे. 

मिहीर शाहाच्या आईदेखील ताब्यात 

वरळी अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक केल्यानंतर मिहिर शहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. गुन्हे शाखेने आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल १२ लोकांना ताब्यात घेतलं.

काय घडलं नेमकं?

वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षाचा असून घटना क्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता.
त्या नंतर तो घरी गोरेगावला गेला, घरी गेल्या नंतर त्याने आपल्या ड्राइव्हरला लॉन्ग ड्राईव्हला जायचे असल्याचे सांगितले. नंतर तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी एनी बेझंट रोडवर त्याने नाखवा दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा मिहीर शहा याने मध्यप्रशन केले होते, असा अंदाज आहे. 

Read More