Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तुमच्या खात्यातील पैशांच्या मेसेजवर नजर ठेवा

जवळपास 30 ते 40 जणांच्या खात्यातून अचानक पैसे काढण्यात आलेत. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर खातेदारांच्या ही बाब लक्षात आली. 

तुमच्या खात्यातील पैशांच्या मेसेजवर नजर ठेवा

वसई : वसईत अनेकांच्या खात्यातून अचानक पैसे काढल्याच्या घटना घडल्यात. जवळपास 30 ते 40 जणांच्या खात्यातून अचानक पैसे काढण्यात आलेत. मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर खातेदारांच्या ही बाब लक्षात आली. 

बातमीतील महत्वाची माहिती

दरम्यान, तुमच्या खात्यातील पैसे असे अचानक काढण्यात आले आहेत, असं असेल तर १० दिवसांच्या आत संबंधित बँक शाखेत लेखी तक्रार द्या, तक्रारीची एक प्रत पोहचसह ताब्यात घ्या, कारण बँक जबाबदार असेल अशा बाबतील तुम्हाला बँक हा परतावा करू शकते, आरबीआयच्या नव्या नियमानुसार.

एटीएम कार्ड जवळ असताना पैसे गायब

एटीएम कार्ड जवळ असताना देखील अशाप्रकारे खात्यातून पैसे काढण्यात आलेत. प्रत्येकाच्या खात्यातून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतराने दोन ते तीनवेळा पैसे काढण्यात आलेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी विविध ठिकाणाहून हे पैसे काढण्यात आलेत. 

दिल्ली, हरियाणा, गुढगावमधून डल्ला

दिल्ली, हरियाणा, गुढगाव या भागातून हे पैसे काढण्यात आलेत. त्यामुळे ही मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. तर याआधी सुद्धा महिनाभरापूर्वी वसईच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून अशाप्रकारे पैसे काढण्यात आले होते. 

पैसे गेल्याचं माहिती पडताच खातेदारांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आतापर्यंत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचं सांगण्यात येतंय.

Read More