Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रस्ता चुकलेल्या तरुणीला आधी मदत, मग किस करत विनयभंग

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली. मात्र तिच्या वाट्याला आला विनयभंग. 

रस्ता चुकलेल्या तरुणीला आधी मदत, मग किस करत विनयभंग

पुणे : रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली. मात्र तिच्या वाट्याला आला विनयभंग. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली. त्याहून धक्कादायक म्हणजे, मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात ही घटना घडली. मात्र, कोणीही या तरुणीच्या मदतीला पुढे आले नाही. पीडीत तरुणी कॅम्प परिसरात रस्ता चुकली होती. त्यातच तिच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. तिनं तिथचे थांबलेल्या एकाची मदत मागितली. त्याने मदत केली. मात्र, त्याने तिचे चुंबन घेत विनयभंग केला. 

रस्ता चुकलेल्या तरुणीने राम बद्रीलाल दाबोडीया याच्याकडे तिच्या मित्राशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल मागितला. बदोडीयाने फोन दिला. फोनवर बोलणे झाल्यानंतर जेव्हा या तरुणीने बदोडीयाला फोन परत दिला. तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. बदोडीयाने या तरुणीचा हात धरला. हाताला किस केला. हाताचे चुंबन घेतले. आणि त्यानंतर तिच्या गालावर आपले ओढ ठेकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकारानंतर ती तरुणी गोंधळून केली. कशबशी सुटका करुन तेथून रडत पळ काढला.
 
दरम्यान, यावेळी या तरुणीच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. मात्र सीसीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली. आणि त्यामुळेच ही घटना पुढे आली. आरोपीची देखील ओळख पटली. राम बद्रीलाल दाबोडीया असे या आरोपीचे नाव आहे. तो ४३ वर्षांचा असून, तो वानवडी येथे राहतो. तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी या आरोपीला पोलिसांनी अटक केली. 

Read More