Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मोहरम संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाचा मोहरम २०२० संदर्भात महत्वाचा निर्णय 

मोहरम संदर्भात उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा सर्व सण उत्सव साधेपणात साजरे होत आहेत. गणेशोत्सव देखील राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार साजरा होताना दिसतोय. मोहरम २०२० साठी देखील मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिलाय. मुंबई पोलीस डिसीपी झोनचे संग्रामसिंह निशादांर यांनी यासंदर्भात माहिती दिली.

आज मुंबई उच्च न्यायालयाने मोहरम २०२० संदर्भात महत्वाचे निर्देश दिलाय. पूर्ण महाराष्ट्रात केवळ एक मिरवणूक निघू शकते. एका ट्रकातून या मिरवणुकीला परवानगी असेल. भेंडी बाजार जंक्शन ते शिया सिमेटरीपर्यंत ही मिरवणूक घेऊन जाता येऊ शकते. यामध्ये केवळ पाचजण असतील. त्यांची नाव, वय आणि पत्ता उद्यापर्यंत पोलिसांकडे असेल. यां पाचजणांसोबत एक व्हिडीओ ग्राफर असणे गरजेचे आहे. 

मिरवणुकीच्या सुरुवातीला, रस्त्यात किंवा शेवटी कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही जुलूस नसेल. संध्याकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत ही मिरवणुकीची वेळ असेल. शिया सिमेटरीच्या शंभर मीटर आधी पाच जणांनी चालत जावे लागेल. 

व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमातून आलेल्या अफवेवर विश्वास ठेवू नका. या निर्देशांची कॉपी जेजे पोलीस स्थानक किंवा इंटरनेवर उपलब्ध आहे. 

Read More