Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू - मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची तुलना थेट संतांशी केली आहे.

संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू - मोहन भागवत

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची तुलना थेट संतांशी केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.  संघ आणि संताचं काम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांचंही काम सारखंच असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीतल्या नाणीज इथं मोहन भागवत यांचा नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्यावतीनं राष्ट्रीय संघाचा गौरव करण्यात आला, त्यावेळी भागवत बोलत होते. संघ मोठी शक्ती झाल्यानंच आज संघाची देश विदेशात चर्चा सुरू आहे. ही शक्ती ज्याला अनुकूल नाही ते संघावर टीका करत असल्याचा टोला भागवत यांनी यावेळी लगावला.

Read More