Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...

MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: मुंबईमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांनी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन प्रश्न विचारला.

उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...

MNS Chief Raj Thackeray On Uddhav Thackeray Comment: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आढावा बैठकी आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरु केल्या असून अशीच एक बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये पक्षाचे जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळेस राज यांना बैठकीबरोबरच इतरही अनेक विषयांवरुन प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, एका पत्रकाराने राज ठाकरेंना माजी मुख्यमंत्री तसेच त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'बिनशर्ट पाठिंबा' या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दात हा प्रश्न उडवून लावला आणि ते पुढल्या प्रश्नाकडे गेले. 

खास आपल्या शैलीत दिली उत्तरं

राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीची तयारी, बैठकीत काय झालं यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. राज ठाकरेंनी खास आपल्या शैलीत या प्रश्नांना उत्तर दिलं. विधानसभेसाठी काय तयारी करत आहात? किती जागा लढण्याची शक्यता आहे? असा प्रश्न एकाने विचारला असता राज यांनी दिर्घ पॉज घेऊन, "आता सांगू? सगळं आता सांगून टाकू?" असा प्रतीप्रश्न पत्रकाराला केला असता उपस्थितांमध्ये एकच हसू पिकलं. पत्रकारांनी अशुद्ध मराठीमध्ये विचारलेले प्रश्नही राज यांनी खोडून काढले. राज यांच्या या उत्तरांमुळे त्यांच्या मागे उभे असलेले पदाधिकारीही हसत असल्याचं दिसून आलं.

नक्की वाचा >> 'कितीही आवडता पक्ष असो किंवा..' जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा 'महाराष्ट्रा'ला सल्ला

आदित्य आणि उद्धव यांचा उल्लेख करत प्रश्न अन् राज यांचा प्रतिसाद

दरम्यान या प्रश्नांच्या सरबत्तीदरम्यान राज ठाकरेंना त्यांचे पुतणे तसेच राज्याचे माजी पर्यटनमंत्री तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाती भाषणात केलेल्या 'बिनशर्ट पाठिंबा'चा उल्लेख करत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज यांना, "तुमच्यावर पर्सनल हल्ले केले जात आहेत. आदित्य ठाकरेंनी सुपारीबाज पक्ष म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी बिनशर्ट अशी टीका केली आहे," असं पत्रकार म्हणत असतानाच राज ठाकरेंनी त्याचा प्रश्न पूर्ण होऊ देण्याआधीच तोंड वाकडं करत हातानेच प्रश्नावरुन पुढे जाण्याचा इशारा केला. पत्रकाराने आदित्य आणि उद्धव यांच्या टीकेवरुन प्रश्न विचारल्याचं ऐकताच राज यांनी पुढला प्रश्न असं हात झटकत, हातवारे करत, 'ठिक आहे रे ते.. पुढे...' असं म्हटलं आणि पुढचा प्रश्न घेतला.

नक्की वाचा >> 'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'

उद्धव नेमकं काय म्हणाले होते?

पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी, "मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की या निवडणुकीत आपण फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळालं. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून 'बिनशर्ट' पाठिंबा दिला," असं म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगावला. "उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट..." असं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवत म्हटल्यानंतर सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्याचं पाहायला मिळालं.

Read More