Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'या' व्यक्तीला शरद पवारांनी वारसदार म्हणून निवडलं असतं तर... आमदार रोहित पवारांच्या वडिलांचा मोठा गौप्यस्फोट

पवार घराणं राजकीय वारस विषय आला त्या वेळी राजकारणात असतो, तर तेव्हाच पवार घराण्यात फूट पडली असती असा दावा राजेंद्र पवारांनी केला. बारामतीत निनावी पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

'या' व्यक्तीला शरद पवारांनी वारसदार म्हणून निवडलं असतं तर... आमदार रोहित पवारांच्या वडिलांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार घराण्याचीच चर्चा आहे. अजित पवार 40 पेक्षा जास्त आंदारांना सोबत घेवून शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाली. राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव आहे घड्याळ हे पक्ष चिन्ह अजित पवारांना मिळाले आहे. यामुळे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. फक्त राष्ट्रवादी पक्षातच नाही तर पवार घरात देखील फूट पडली आहे. पवार घराण्यात पडलेल्या या फुटीबाबत आमदार रोहित पवारांच्या वडिलांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.   

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून खुले पत्र लिहिल्यानंतर आता बारामतीत देखील एक निनावी पत्र सोशल मीडियावर वायरल होत आहे. या पत्रात सद्यस्थितीची राजकीय परिस्थिती अजित पवार यांनी भाव-भावकीच्या तालावर आणून ठेवलीय असा उल्लेख करण्यात आला आहे. बारामतीकरांची भूमिका या नावाने हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पत्रविषयी आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले राजेंद्र पवार ? 

जेव्हा लोकांना दाबावातून व्यक्त होता येत नाही तेव्हा पत्रातून व्यक्त होतात असं म्हणत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पवार घराण्याच्या राजकीय वारसाचा विषय जेव्हा आला त्याच वेळी जर मी तेव्हा राजकारणात आलो असतो तर तेव्हाच आता निर्माण झालेली परिस्थिती आली असती. तेव्हाच पवार घराण्यात उभी फूट पडली असती असे राजेंद्र पवार म्हणाले.

अजित पवारांच्या पत्रात काय होते?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप, शिवसेनेसोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमातून विविधप्रकारे आजही चर्चा होत आहे. याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने याबाबत केलेला हा पत्रप्रपंच. 1991 पासून मी राजकीय जीवनात ख-या अर्थाने वाटचाल करतो आहे. मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला.माझी व त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे.त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यतली विकासाच्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षमक कशा करता येतील याचा विचार आहे.

Read More