Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नितेश राणे यांनी आक्रमक रुप धारण करुन त्यांच्या समर्थकांनी अभियंत्यावर चक्क बादलीतून चिखल ओतला.

आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे अनेकांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्गातील कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर जास्त खड्डे असून चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जबाबदार धरण्यात आली. आमदार नितेश नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाजवळील पुलावर अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला. त्यानंतर त्यांना नदीवरील पुलावर बांधले.  

कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना गडनदीवरील पुलावर रोखून धरले. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी चक्क चिखल अभियंत्याच्या अंगावर फेकला. दरम्यान, कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. तसेच खड्ड्यांमुळे आणि बांधकामुळे कणकवलीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. 

काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला. शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला. 

Read More