Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश

उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

शेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश

उस्मानाबाद : उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हे आदेश दिलेत. उमरगा तहसीलदार, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांना हे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी उमरग्याचे उपविभागीय अधिकारी चौकशी करणार आहेत. 

अधिका-यांकडून शेतक-यांची क्रूर चेष्टा करण्यात आल्याचे झी मीडियाने समोर आणलं होतं. झी मीडियाच्या दणक्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत. 

Read More