Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम

दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत.

दूध अनुदान : सरकारला 6 तारखेपर्यंत अल्टीमेटम

पुणे : दुधाच्या अनुदानावरुन दुध व्यावसायिक संघ आता चांगलेच अक्रमक झालेत. सरकारनं दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान घोषित केलय. मात्र ते अनुदान दूध संघांना मिळालं नसल्यानं पुन्हा प्रश्न निर्माण झालाय.  सरकारला येत्या 6 तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयानं दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिलाय. 

सरकार अनुदान देण्यास चालढकल करत असल्याचा आरोपही दुध संघांनी केलाय. दुधाच्या थकीत अनुदाना संदर्भात शनिवारी पुण्यात दुध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची आणि विभागीय दुग्ध विकास अधिकारी यांच्यात बैठक झाली. 

या बैठकीला गोकूळ, वारणा, राजारामबापू, डायनॉमीक्स, सोनाईसह अनेक दुध उत्पादक संघांनी हजेरी लावली होती.  सरकारकडं पन्नास दिवसाचं साधारण 180 कोटी अनुदान थकलय, माञ सरकार ते देण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप दुध व्यावसायिक संघांनी केलाय.

Read More