Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

दूध आंंदोलनामुळे दूध टंंचाईची शक्यता

सोमवारपासून दूरदरावरून महाराष्ट्रभरात आंदोलनाला सुरूवात झाली आहे.  

दूध आंंदोलनामुळे दूध टंंचाईची शक्यता

पुणे : सोमवारपासून दूरदरावरून महाराष्ट्रभरात आंदोलनाला सुरूवात झाली आहे.  दुधबंद आंदोलनामुळे शहरात दूध टंचाई जाणवू लागली आहे. दुध संघाच्या संकलनावर मोठा परिणाम झालाय.

आज दूधकोंडी फुटली नाही तर... 

 पुण्यात चितळे दुधाचं सर्वाधिक वितरण होतं. चितळेंकडे दिवसाला सुमारे साडेसहा लाख लिटर दूध संकलन होतं. मात्र त्यांचं दूध संकलन दोन दिवस बंद आहे. त्यामुळे आज साठवणूकीतील दूधाचं वितरण करण्यात आलं. किंवा चितळे ऐवजी जे उपलब्ध आहे ते दूध वितरित करण्यात आलं. कात्रज दूध संघाच्या संकलनावरही परिणाम झालाय. त्यांच्याकडे सव्वा लाख लिटर दूधाचं संकलन होतं. सोमवारी मात्र ते केवळ ६० हजार लिटर इतकच झालय. या पार्श्वभूमिवर आज दूधकोंडी फुटली नाही तर उद्या दूध वितरण शक्य होणार नसल्याचं संबंधितांनी सांगीतलय. 

Read More