Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

हिंदू एकता मोर्चाचे मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पुणे : हिंदू एकता मोर्चाचे मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने नाकारला आहे. म्हणून मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव-भिमा हिंसा, दंगल आणि जाळपोळ प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

मिलिंद एकबोटे अडचणीत

कोरेगाव-भिमा दंगल प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यावर अॅट्रॉसिटीसह काही कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात व्हॉटसअॅपवरील तसेच सोशल मीडियावरील काही पुरावे कोर्टात सादर करण्यात आले. तसेच मिलिंद एकबोटे यांच्यावर या आधीही गुन्हे आहेत, याविषयी देखील माहिती देण्यात आली.

कोरेगाव-भिमाच्या दंगलीमागे हात असल्याचा आरोप

कोरेगाव-भिमा येथे ०१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगावातील योद्धांना अभिवादन करण्यासाठी दलितांची उपस्थिती होती, तेव्हा त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी दंगलीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी मिलिंद एकबोटे, तसेच संभाजी भिडे यांच्यावर आरोप झाले, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दलित संघटनांकडून ठिकठिकाणी निषेध

या युवकांना भडकवण्यामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. भिमा कोरेगावातील दंगलीनंतर विविध दलित संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्य़क्त केला होता, तसेच कारवाईची मागणी केली होती.

Read More