Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नवी मुंबईत कांदा - बटाटा बाजारात माथाडींचे कामबंद आंदोलन

Mathadi workers strike in onion-potato market : एपीएमसीतील कांदा - बटाटा बाजारातील 50 किलो वजन हाताळणीचा तिढा सुरूच आहे.  

नवी मुंबईत कांदा - बटाटा बाजारात माथाडींचे कामबंद आंदोलन

नवी मुंबई : Mathadi workers strike in onion-potato market : एपीएमसीतील कांदा - बटाटा बाजारातील 50 किलो वजन हाताळणीचा तिढा सुरूच आहे. सोमवारी माथाडी कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन केल्यामुळे बाजारात 300 गाडी शेतमाल पडून राहिला आहे. यामुळे व्यवहार ठप्प झाला आहे. (Mathadi workers strike in Navi Mumbai's onion-potato market)

माथाडी कामगारांच्या काम बंद आदोलनामुळे 7 कोटींच्या मालाचे नुकसान झाले आहे. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातील हा वाद गेली दीड ते दोन वर्षे सुरूच आहे. त्यामुळे वारंवार या बाजारातील व्यवहार ठप्प होत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील कांदा-बटाटा बाजारामध्ये येणार्‍या कांदा - बटाटा यांच्या 50 किलोपेक्षा जास्त वजन असणारी गोणी न उचलण्याचा निर्णय माथाडी कामगारांनी घेतला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात तोडगा काढण्यात आला होता. परंतु पुन्हा बाजारामध्ये 50 किलोपेक्षा जादा माल बाजारात येऊ लागला आहे, त्यामुळे याला माथाडी कामगारांनी विरोध केला आहे.

माथाडी कामगार 50 पेक्षा जास्त किलोचा माल उचलत नसल्यामुळे व्यापार्‍यांनी सोमवारी कांदा-बटाटा मार्केट बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे माथाडी कामागारांनीदेखील सोमवारपासून कांदा-बटाटा मार्केटमधील एपीएमसीला मुख्यालयामध्ये सचिवांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता.

माथाडी कामगारांनी सोमवारी माल न उचल्यामुळे कांदा बटाटा मार्केटमध्ये येणारा माल वाहनांमध्ये तसाच पडून होता. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काही व्यापारी हे स्वतःहूनच 50 किलोपेक्षा जादा वजनाच्या गोण्या बाजारात मागवत आहे. त्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. तर माथाडी कामगार गोण्या उचलत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

Read More