Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली.

Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड: आगी लागण्याचे प्रकार हल्ली अनेक ठिकाणी वारंवार घडताना पाहयला मिळत आहेत. त्यातून नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार एका लहानश्या घराला शॉर्टसर्क्रीटमुळे (Short Circit) भीषण आग लागली आहे. घराला लागलेल्या आगीत लग्नासाठीची रोख रक्कम आणि सोने जळून खाक झाले. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबाद शहरात ही घटना घडली. आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. संजय पळगे यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत घरात असलेल्या विवाह (Marriage) सोहळ्यासाठी आणून ठेवलेले नगदी 85 हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जळून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. आगीच्या या घटनेचा प्रशासनाने पंचनामा केला असून पिडीत कुटुंबाने मदतीची मागणी केलीये. (massive fire outburst in nanded all luxury items and money for marriege gets burned)

रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागून लग्नासाठी जमवलेल्या एवजाची राखरांगोळी झाली. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात ही घटना घडली. आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. धर्माबाद शहरात पळगे कुटुंब राहते. पळगे कुटुंबातील युवक संजय पळगे (Sanjay Palge) याचे काही दिवसानंतर लग्न होते. रोजमजुरी करणाऱ्या या युवकाने आपल्या लग्नासाठी उसनवारी करून 85 हजार रुपये जमा केले होते. पळगे कुटुंबातील सर्व सदस्य ही मजुरी करीत असून अत्यंत गरीब परिस्थिती आहे. 

छोट्याश्या घरात हे कुटुंब वास्तव्य करते. सोमवारी सर्व कुटुंबीय रोजमजुरीसाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या बंद असलेल्या घराला अचानक अगा लागली. शेजाऱ्यांनी दार तोडून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु या आगीत (Fire) घरात असलेल्या विवाह सोहळ्यासाठी आणून ठेवलेले नगदी 85 हजार रुपये आणि सोन्या (Gold and Sliver) चांदीचे दागिने जळून खाक झाले.

घरातील इतर साहित्यही जळून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीच्या या घटनेचा प्रशासनाने पंचनामा केलाय. या आगीमुळे लग्न सोहळ्याचे स्वप्न रंगवणाऱ्या गरीब कुटुंबावर संकट कोसळय. या संकटातून सावरण्यासाठी पिडीत कुटुंबाने कळवळीनं पुन्हा पुन्हा मदतीची मागणी केलीये.

Read More