Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शहीद किरण थोरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 शहरातील अनेक मान्यवरांनीही शहीद किरण थोरात यांच्या हौतात्म्याला अभिवादन केलं.

शहीद किरण थोरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

औरंगाबाद : काश्मीरमध्ये वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र किरण थोरात यांच्यां पार्थिवावर फकीराबादवाडी या त्यांच्या मुळं गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी शहीद झालेल्या या शूरवीराला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंचक्रोषीतील नागरिक उपस्थित होते.  किरण थोरात यांच्या घराजवळच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात य आले.  

तत्पूर्वी लष्करी इतमामात औरंगाबाद विमानतळावर त्यांना मानवंदना देण्यात आली. शहरातील अनेक मान्यवरांनीही शहीद किरण थोरात यांच्या हौतात्म्याला अभिवादन केलं. जम्मू-काश्मिरात पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत बुधवारी भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यात औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र किरण थोरात यांना वीरमरण आले.

Read More