Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

नागपूर : शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपूरा येथे २४ सप्टेंबर २०२०  रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात येथील जवान बडोले शहीद झालेत. 

fallbacks   

शहीद जवान  बडोले यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुली मृणाल  तसेच प्रज्ञा  यांनी मुखाग्नी दिला. त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने  बंदुकीच्या फैरी 
हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. यावेळी  त्यांच्या पत्नी  प्रमिला नरेश बडोले आप्त परिवार आणि सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गृहमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

fallbacks

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीद झालेल्या नरेश बडोले यांच्या निवासस्थानी जावून अंत्यदर्शन घेतले. बडोले यांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार असं सांगत कुटुंबाची सांत्वना केली. शहीदाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. 

Read More