Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, भाजप आमदारांचा आरोप

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. 

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, भाजप आमदारांचा आरोप

औरंगाबाद : मराठवाड्यातल्या डांबर गैरव्यवहाराची चौकशीला परवानगी का देत नाही, असा सवाल करत औरंगाबाद खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि एसीबीला नोटीस पाठवलीय. मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. 

सध्याचे रस्ते सचिव सी.पी .जोशी घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा दावा बंब यांनी केलाय. प्रशांत बंब यांनी याबाबत तक्रार केली होती. काही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी या तक्रारीत केली होती. एसीबीनं प्रथम दर्शनी तक्रारीत तथ्य असल्याचं सांगत, बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र बांधकाम खातं अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची परवानगी देत नव्हतं. त्यामुळे बंब यांनी खंडपीठात धाव घेतली होती. 

Read More