Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

MPSC Postpone | राज्यसेवा पूर्व परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रीया

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे

MPSC Postpone | राज्यसेवा पूर्व परीक्षा पाचव्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रीया

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC)राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. 

राज्यसेवा पूर्व  परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा याआधीच 4 वेळा  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली  होती.

आज आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार ''राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात निर्बंध लावण्यात आले आहेत.या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.'

या परीक्षेचे पुढील वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा देत असतात.

गेल्यावर्षापासून या परीक्षा होऊ शकलेल्या नाही. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.  

Read More