Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कारचा ॲक्सिडेंट - दानवे

शिवसेनेचा मतदार भाजपकडे वळाल्याचा दावा 

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कारचा ॲक्सिडेंट - दानवे

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने ६० टक्के पेक्षा जास्त जागा जिंकल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तर शिवसेनेचा मतदार भाजपकडे वळाल्याचा दावा ही दानवेंनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कारचा ॲक्सिडेंट झाल्याचा टोलाही दानवेंनी लगावला आहे.

रावसाहेब दानवे यांनी म्हटलं की, 'शिवसेनेचा मतदार भाजपकडे आला आहे. कोकणसह इतर भागात भाजप वाढला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. तीन चाकी पैकी एक चाक खड्ड्यात गेलं आहे. भाजपच्या बाजूनं जनतेनं कौल दिला आहे. भाजपकडे ६० टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायती आल्या आहेत. त्यांच्या मार्गात अजून नगर पालिका आणि महापालिका पुढे आहेत. मुख्यमंत्री म्हणतात हातात कार आणि सरकार हातात आहे. पण निकालातून महाविकास आघाडीच्या कारचा अपघात झाला आहे.'

जनतेची नाराजी महाविकास आघाडीवर आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसून आला नाही. असं देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Read More