Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?

Maharastra Politics On Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र असं असलं तरी नेत्यांमध्ये मात्र मोठा भाऊ कोण, यावरून कुरघोडी सुरू झाल्यात. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) आमचा स्ट्राईकरेट जास्त आहे. त्यामुळे आम्हीच महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाटांनी (Sanjay Shirsat) केला होता. मात्र मोठा भाऊ कोण यावरून शिंदेंच्या शिवसेनेतच एकवाक्यता नसल्याचं समोर आलंय. कारण शिंदे गटाचे नेते संजय निरूपमांनी शिरसाटांचा (Sanjay Nirupam) दावा खोडून काढताना भाजपच मोठा भाऊ असल्याचं म्हटलंय.

संजय निरुपम यांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचं सांगत पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिलाय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या वादावर बोलणं टाळलं. तर एखाद्या नेत्याची भूमिका ही पक्षाची भूमिका असू शकत नाही अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केली.

माजी मंत्री गणेश नाईकांच्या वक्तव्यामुळं आधीच सत्ताधारी महायुतीत मतभेद असल्याचं स्पष्ट झालं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी आमचे नेते फडणवीसच आहेत, असं नाईकांनी स्पष्ट केलं. आता महायुतीत कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ यावरून वाकयुद्ध सुरू झालंय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागांच्या बार्गेनिंग पॉवरसाठी ही खेळी आहे हे समजायला जोतिषाची गरज नाहीये.

दरम्यान, दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेची निवडणूकही सोबत लढवण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीला केवळ 4 जागा शिल्लक आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला किती जागा मिळणार? आणि कोणता पक्ष कोणत्या रणनितीचा वापर करणार? असा सवाल विचारला जात आहे.

Read More