Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra weather : राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कुठे दिसणार अवकाळीचे परिणाम

Maharashtra weather Latest Update : ऐन उन्हाळ्याच्या दिवसांच राज्यात सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळं अनेक संकटं ओढावली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे, तर नागरिकांमध्ये आरोग्याच्याही समस्या उदभवू लागल्या आहेत.   

Maharashtra weather : राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कुठे दिसणार अवकाळीचे परिणाम

Maharashtra weather Latest Update : महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसानं अद्यापही राज्यातून काढता पाय घेतलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील काही भागांना सतर्क करणारा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मुंबईत गुरुवारी ढगाळ वातावरण होतं. ज्यानंतर शुक्रवारचा दिवस प्रखर सूर्यप्रकाशानं झाला. असं असलं तरीही शहर आणि राज्यावरून पावसाचं सावट गेलेलं नाही. (Maharashtra weather news rain predictions in marathwada imd issues alert )

हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून राज्यातील उद्यापासून मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे नाशिक, नंदुरबारसह विदर्भातही काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. अवकाळीचे परिणाम सोलापूरमध्येही दिसून येतील. 

आठवड्याभरात कसं असेल देशातील हवामान ? 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदानुसार छत्तीरगढचा दक्षिण भाग, मराठवाडा, विदर्भ, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या भागांमध्ये 24 ते 26 मार्चदरम्यान मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. तर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलक्या स्वरुपातील बर्फवृष्टी होऊ शकते. 

दरम्यान, आयएमडीच्या वृत्तानुसार इराण आणि आजुबाजूच्या परिसरात पश्चिमी झंझावात सक्रीय झाला आहे, जो पुढील 2 ते 3 दिवसांत उत्तर भारताच्या दिशेनं सरकेल. तर, राजस्थान आणि नजीकच्या भागावर चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होताना दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : Accenture Layoff: टेन्शन वाढवणारी बातमी! भारतातील दुसरी सर्वात लोकप्रिय IT कंपनी 19,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पंजाब आणि पश्चिम राजस्थानमध्ये 23 ते 25 मार्चदरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असेल. तर, 25 मार्चनंतर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा या भागांमध्येही पावसाची हजेरी असेल. 

देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सुरु असणाऱ्या पावसामुळं तापमानामध्येही काहीसे बदल नोंदवले जाणार आहेत. साधारण पुढच्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमान अपेक्षेहून दोन अंशांनी कमी असेल. किमान तापमानात फारसे बदल होणार नाहीत असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. 

 

Read More