Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त   

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त

Maharashtra Weather News : मागील आठवड्यात वीकेंडपासूनच पावसानं हजेरी लावत अगदी सोमवारपर्यंत तो मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये दमदार हजेरी लावून गेला. इतकी दमदार की मुंबईचाही वेग मंदावला. पावसाच्या या धर्तीवर शहरात रेड अलर्टही जारी करण्यात आला. पण, हा अलर्ट मात्र काहीसा गोंधळला. कारण, मंगळवारी जणू शहरात वादळानंतरची भयाण शांतता अर्थात पावसाच्या हजेरीअभावी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार बुधवारी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार आहे असा इशाराही देण्यात आला. 

कोकणासह घाटमाथ्यावर कोसळधार! 

इथं मुंबईत पावसानं एका दिवसाचा दमदार प्रयोग केल्यानंतर पुढं त्याची अधूनमधून हजेरी असेल. मात्र राज्याच्या कोकण पट्ट्यामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेसुद्धा वाचा : हायवेवर जेव्हा अख्खा डोंगर कोसळतो... प्रत्यक्षात काळ दाखवणारा VIDEO

उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ताशी 40 ते 50 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांच्या सोबतीनं मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी पाहायला मिळेल. विदर्भातही चित्र वेगळं नाही. इथं हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. 

सध्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेच्या दिशेनं झुकला असून, राजस्थान, पुरीपासून तो पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय असल्याचं निरीक्षण हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे. तिथं गुजरातपासून केरळच्या उत्तर भागापर्यंतसुद्धा समांतर रचनेमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं सध्या देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. 

 

Read More