Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra Weather Updates : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी

Maharashtra Weather : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.  

Maharashtra Weather Updates : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी

Maharashtra Weather : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. (Cold Wave In Maharashtra) 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा हा कडाका कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतोय. अशातच राज्यातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईतही किमान तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. ३० जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट होईल. आधी २६ जानेवारीपर्यंत थंडीचा जोर कमी होईल, असा अंदाज होता. मात्र आता नवीन अंदाजानुसार राज्यात पुन्हा हुडहुडी वाढणार आहे. 

उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. जम्मू-काश्मीर बर्फ पडत आहे. त्याचा परिणाम हा राज्यावर दिसून येत आहे.  पुणे, मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढणार आहे. मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात अद्यापही थंडीचा कडाका कायम आहे. राजस्थानातील नैऋत्य भागात चक्रीवादळासारखी स्थिती असल्याने त्याचा परिणाम भारतातील इतर राज्यांवरही होत आहे.तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशतः घट होऊ शकते.

Read More