Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान अद्याप झालेलं नसतानाच दिवाळीच्या आसपास होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. सोमवारी मुंबईत झालेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याची झलक पाहायला मिळाली. राज्यातील एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जगांसाठी आग्रही असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा करु नये, असं ही भुजबळ थेट भारतीय जनता पार्टीचं नाव घेत म्हणाले. मात्र आता भुजबळांच्या या विधानावरुन महायुतीमधील मित्रपक्षांमधून नाराजी व्यक्ते केली जात आहे. असं असतानाच निलेश राणेंनी भुजबळांनी आवरलं पाहिजे असा खोचक सल्ला दिला आहे. 

भुजबळांच्या प्रतिक्रियेवर फडणवीसांचं उत्तर

विधानसभा निवडणुकीला 80 ते 90 जागा देण्याच्या शब्दाची भाजपाला आतापासूनच आठवण करुन द्यावी, अशी अपेक्षा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच, भाजपा हा मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढेल, मात्र मित्र पक्षांचा सन्मान ठेवला जाईल, असं उत्तर दिलं. लोकसभेच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाटल्याला चारच जागा आल्याचं शल्य बोलून दाखवत भुजबळांनी विधानसभेला अशी खटपट करायला लागू नये अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली. आता भुजबळांच्या याच आक्रमक भूमिकेवर निलेश राणेंनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

निलेश राणे काय म्हणाले?

"छगन भुजबळांना आवरलं पाहिजे," असं म्हणत निलेश राणेंनी छगन भुजबळांच्या विधानाच्या बातमीचं कात्रण शेअर केलं आहे. "मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?" असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे. "मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे भाजपाला डिवचत असतात, ही त्यांची भूमिका बरोबर नाही," असंही निलेश राणे म्हणाले आहेत. "आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही," असा टोला नितेश यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> Vidhan Sabha Election 2024: दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; 'या' तारखांना विधानसभेचं मतदान?

पोस्टच्या शेवटी, "आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठ सूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे," असंही निलेश राणे म्हणालेत.

fallbacks

आता निलेश राणेंच्या या विधानावर भुजबळ काही प्रतिक्रिया नोंदवणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. राज्यातील विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Read More