Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

राज्याातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षण रामभरोसे सुरु असल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भंडाऱ्यात एका गावात अवघ्या तीन खोल्यांची शाळा भरते. दिवसा शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी या शाळेची परिस्थिती आहे. आश्रमशाळेत मुलीही शिकतात पण त्यांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत.

तीन खोल्यांची शाळा, 1 ते 10 वी इयत्तेसाठी दोनच शिक्षक... राज्यातील आदिवासी आश्रम शाळेचं भयाण वास्तव

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : राज्यात आदिवासी आश्रम शाळेचं (Tribal Ashram School) भयानक वास्तव पुन्हा एका समोर आलं आहे.  भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आंबागड इथं अनुदानित आश्रम शाळा असून 1 ते 10 वी पर्यंतच वर्ग आहेत. पण या 10 वर्गाला शिकवण्यासाठी फक्त दोनच शिक्षक (Teachers) असल्याने आदीवासी विदयार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु आहे.  तीन खोल्यांमध्ये 1 ते 10 वीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. धक्कादायक म्हणजे दिवसभर शाळा आणि रात्री हॉस्टेल अशी परिस्थिती असून मुलींकरिता महिला अधीक्षक नसल्याने संस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

आदिवासी आश्रमशाळेचं भयाण वास्तव
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आदीवासी समाजांची लोकसंख्या अधिक आहे, तालुक्यातील आंबागड इथं स्वामी समर्थ प्राथमिक माध्यमिक आदीवासी आश्रम शाळा आहे, या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आहेत. एकूण विद्यार्थी संख्या 37 आहे, महत्वाची बाब म्हणजे 1 ते 10 वर्गाला शिकविण्यासाठी फक्त दोनच शिक्षक आहे. हे दोन शिक्षक 10 वर्गाना कसे शिक्षण देत असतील याची कल्पना न केलेलीच बारी.  10 वर्गांकरिता तीनच खोल्या आहेत. एका खोलीत 1 ते 4 पर्यंतचे वर्ग भरतात आणि एक शिक्षक एकाच वेळी चार वर्गाना शिक्षण दोतो

दुपारी त्याच खोलीत 5 ते 10 पर्यंतचे वर्ग भरतात व रात्री इथेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, महत्वाची बाब म्हणजे या आदीवासी आश्रम शाळेत मुली देखील आहेत पण देखरेख करीत अधीक्षकचं नाही. त्यामुळे या मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. एकीकडे आदीवासी समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे म्हणून शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. पण 10 वर्गाना शिकविण्यासाठी दोन शिक्षक असल्याने आदीवासी मुलांचा भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे. 

या शाळेचा आणखी एक प्रताप म्हणजे एका व्यक्तीने आपल्या दोन मुलींना या शाळेत दाखल केलं. पण शाळेची अवस्था आणि शिक्षण व्यवस्था पाहून त्यांनी दोनही मुलींना त्या शाळेतून काढलं आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला.  या धक्कादायक म्हणजे त्या दोन्ही मुलींची नाव आजही शाळेच्या हजेरीपटावर आहेत. आणि त्यांची नियमित हजेरीदेखील लागते.

तर दुसरीकडे शाळा सुरु करण्यासाठी UDISE (Unified District Information System for education) नंबर आवश्यक असतो. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील वर्षात दाखला मिळतो. मात्र या शाळेला असा कोणताही  UDISE नंबरच नाहीएत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकशान होण्याची शक्यताआहे. आदीवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकशान झालं तर या विरोधात आदीवासी संघटना आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे,

Read More