Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Reality Check | नागरिकांचा निष्काळजीपणा, मास्क न घालण्याची ही कारणं तुम्ही ऐकलीच नसतील

या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर केली. नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचं पालणं करावं, असं आवाहन यात करण्यात आलंय. 

Reality Check | नागरिकांचा निष्काळजीपणा, मास्क न घालण्याची ही कारणं तुम्ही ऐकलीच नसतील

अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Varient) आढळलाय. या व्हेरिएंटचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन (Omicron) असं केलंय. या व्हेरिएंटने जगात खळबळ माजवलीये. राज्य सरकारही (Maharashtra State Government) सतर्क झालीये. या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर केली. नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचं पालणं करावं, असं आवाहन यात करण्यात आलंय. राज्यातील जनता सरकारच्या या आवाहनाचं किती पालणं करतंय, याचा रिएलॅटी चेक केलाय. लोकांनी मास्क न घालण्यामागील काय कारण सांगितलंय, हे आपण पाहणार आहोत. (Maharashtra State Governments New variant omicron guidelines See Reality Check Do People in Solapur Follow the Rules)

सोलापूरात (Solapur) रिऍलिटी चेक केला. अनेकांनी मास्क न घालण्याची असे एकसेएक कारणं दिली, जी तुम्ही आतापर्यंत ऐकली नसतील. सोलापूर बस स्थानकावर  हा रिऍलिची चेक करण्यात आला. इथे अनेक जण बिनबोभाट विनामास्क फिरत होते. काहींनी कॅमेरा पाहताच मास्क घातला. तर विनामास्क फिरणाऱ्यांनी मास्क न घालण्याची कारणंही सांगितली.

"बघू, लावू मास्क, असं एकाने कारण दिलं. तर दुसऱ्या एकाने "मला लक्षात नव्हतं, माझ्याकडे मास्क आहे, पण तो घरी राहिला", असं उत्तर दिलं.  "कोरोनाची भिती आहे, गाडी पुसत होतो, म्हणून मास्क नाही घातला". अशी उत्तर आम्हाला मास्क का नाही घातला, या प्रश्नावर मिळाली.  एकाने तर हद्दच केली. मास्क का नाही घातला, असा प्रश्न विचारल्यावर उर्मटपणे "घालतो ना मग", असं उत्तर दिलं.

नवीन विषाणू भारतात येऊ नये पुन्हा लॉकडाऊन होऊ नये त्यासाठी योग्य ती खबरदारी सरकारकडून घेतली जात असली .तरी नागरिकांमध्ये कुठलीच भीती पाहायला मिळत नाहीये .कारवाईची भीती  ही लोकांच्या मध्ये दिसत नाहीये. एकूणच काय या लोकांनी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीला केराची टोपली दाखवली आहे. 

जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका आहे. हा धोका टाळायचा असेल, तर मास्क घालावाच लागेल. त्यामुळ राज्य सरकारने सांगतिलेल्या नियमांच पालण करा. 

Read More