Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार

Maharashtra HSC 12th Results 2023: वर्षभराचा अभ्यास आणि एका नव्या शैक्षणिक वाटेवर जाणाऱ्याची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांच्या मनात दाटाली आहे. त्यातच दडपण आहे ते म्हणजे निकालांचं... 

Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार

Maharashtra HSC 12th Results 2023: साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच बारावी आणि मार्च महिन्यापासून इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. ज्यानंतर आता काही दिवसांची सुट्टीही शेवटच्या टप्प्यात आली  आहे. पण, आता मात्र सुट्टी संपण्याच्या निराशेऐवजी विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे परीक्षांच्या निकालांकडे. 

वर्षभर प्रचंड अभ्यास करून महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा ओलांडू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अवघ्या काही दिवसांतच Maharashtra State Board कडून जाहीर केलं जाणार आहे. थोडक्यात बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांसंबंधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. 

इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. 

सीबीएसईमागोमाग महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडूनही जाहीर केले जाणार निकाल 

काही दिवसांपूर्वीच देशात सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लावण्यात आला. यामध्ये इयत्ता बारावीचा निकाल 87.88 टक्के लागला. तिथे सीबीएसईचे निकाल लागल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या निकालांकडे पालक आणि विद्यार्थ्यांच्या नजरा वळल्या आणि आता काही दिवसांतच निकालांची तारीखही समोर आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावी, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. त्यामुळं करिअरच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांवर आता या वर्गांकडून शेवटची नजर टाकली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुनर्मुल्यांकन आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होईल. 

हॉलतिकीट तयार ठेवा आणि या लिंकही Save करून ठेवा... 

इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. जिथं गेलं असता प्राथमिक माहितीचा तपशील भरून त्यांना Marksheet पाहता येईल. 

निकाल पाहण्यासाठी  https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळासोबत विद्यार्थी किंवा पालक mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात. 

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) आणि दहावी (SSC) पैकी अपेक्षित पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहितीचा तपशील भरावा आणि त्यानंतर काही क्षणांतच निकालाचे आकडे तुमच्यासमोर असतील. एकाच वेळी राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी आणि पालक या संकेतस्थळावर भेट देणार असल्यामुळं काहींना निकाल पाहताना अडचणींसा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं तांत्रिक अडथळे उदभवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये हे एकच आवाहन.

 

Read More