Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.   

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट

Maharashtra Sindhudurg Crime : गेल्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  (Sindhudurg Foreign Woman Update )जंगलात एक विदेशी महिला साखळीनं झाडाला बांधलेली सापडली होती. या प्रकरणात नवं नवीन खुलासे समोर येत आहेत. आपल्याला पतीने इंजेक्शन देऊन जंगलात झाडाला बांधून ठेवलं होतं, असं महिलेने पोलिसांना दिलेल्या चिठ्ठीत सांगितलं होतं. त्याच्याजवळ अमेरिकन पासपोर्ट फोटोकॉपीशिवाय तमिळनाडूचा पत्ता असणारे आधार कार्ड, रेशन कार्ड सापडलं होतं. पण आता या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय. 

सर्वात मोठा ट्विस्ट !

या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पतीचा शोध घेतला. तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिने ज्या नवऱ्याचे नाव आणि त्याचा पत्ता दिला. त्यावर पोलिसांनी शोध सुरु केला. पण जी माहिती समोर आली त्यानंतर पोलीस गोंधळले आहेत. महिलेने दिलेल्या पत्तावर त्या नावाचा कोणी व्यक्तीच अस्तित्वात नाही. एवढंच नाही तर आधार कार्ड, रेशन कार्डवर जो तामिळनाडूमधील घराच्या परमनंट पत्ता दिला आहे. त्या पत्तावर पोलीस पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याचा डोळ्यासमोर तिथे घर नाही तर दुकान होतं. 

हेसुद्धा वाचा - अमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'

मोबाईल आणि टॅबमधून धक्कादायक खुलासा 

पोलिसांना महिलेचा मोबाईल आणि टॅब हाती लागला असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ही महिला काही महिन्यांपूर्वीच गोव्यातून बांबोळी रुग्णालयात त्याशिवाय अनेक रुग्णालयात मानसिक उपचारासाठी आली होती, हे उघड झाल आहे. त्यासोबत या मोबाईल आणि टॅबच्या आधारे असंही पोलिसांना दिसून आलं की या महिलेचा वावर हा मुंबई आणि गोवामध्ये आतापर्यंत अनेक आढळला असून ती एकटीच असल्याच समोर आलंय. 
तिचं मानसिक संतुलन बिघडलेल्यामुळे या महिनेने स्वत:हून जंगलात बांधून घेतलं आणि समाजा, पोलिसांची दिशाभूल करुन सर्वांची झोप उडवल्याचा प्राथमिक अंदाज सिंधुदुर्ग पोलिसांनी लावला आहे. त्यामुळे तिने नवऱ्याने इंजेक्शन देऊन मारहाण केली आणि नंतर जंगलात सोडलं हा सगळ्या बनाव असल्याच पोलिसांचा दाट शक्यता वाटतेय. दरम्यान या महिलेला उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 
 

Read More