Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'

Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात एका 50 वर्षीय महिलेला लोखंडी साखळीनं झाडाला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संबंधित महिला कोण आहे आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं हे समोर आलंय. 

अमेरिकेचा पासपोर्ट तर तामिळनाडूचं आधार कार्ड, कोकणातील घनदाट जंगलात आढळलेल्या महिलेला 'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'

Maharashtra Sindhudurg Crime : कोकणातील घनदाट जंगलात गुराखी आणि शेतकऱ्याला महिलेचा रडण्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी जे दृष्य पाहिलं त्यानंतर त्यांना धडकी भरली. एक महिला झाडाला साखळीने बांधलेली होती. अनेक दिवसांपासून तिला तिथे बांधण्यात आल्याच प्रथमदर्शनीय दिसत होतं. अनेक दिवसांपासून उपाशी आणि तहानलेली महिला पाहून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात या घटनेनंतर परिसरात भीतीदायक वातावरण आहे. 

कोण आहे ही महिला आणि नेमकं काय झालं तिच्यासोबत?

पोलिसांनी तिची सुटका केल्यानंतर तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अधिक उपचारासाठी तिला गोव्यात हलवण्यात आलं. पोलिसांनी या घटनेचा तपास करताना तिची ओळख पटल्याच सांगितलंय. 

ही महिला मूळची अमेरिकेची असून सध्या ती तामिळनाडूमध्ये राहत होती. कारण पोलिसांना या महिलेकडे अमेरिकन पासपोर्ट फोटोकॉपीशिवाय तमिळनाडूचा पत्ता असणारे आधार कार्ड, रेशन कार्डही मिळालंय. दरम्यान या प्रकरणात अमेरिकन दुतावासाने जलदगतीने तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. 

'नवऱ्यानेच इंजेक्शन देऊन...'

अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने ती अशक्य झाली आहे. त्यामुळे प्रथम तिने पोलिसांना तिच्यासोबत काय झालं याबद्दल सांगितलं नाही. मात्र उपचारानंतर तिने एका चिठ्ठीवर इंग्रजीत तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं. 
त्या चिठ्ठीत तिने असा दावा केलाय की, गेल्या 40 दिवसांपासून ती त्या जंगलात होती. तिथे ती 40 दिवसांपासून उपाशी होती. त्याशिवाय पतीनेच जंगलात झाडाला साखळदंडाने बांधल्याचं तिने या पत्रात सांगितलंय. पतीने तिला इंजेक्शन देऊन जंगलात सोडलं होतं. या इंजेक्शनमुळे तिचा जबडा उघडत नव्हता. 

हेसुद्धा वाचा - केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले, 19 जणांचा मृत्यू, घटनेचा VIDEO समोर

तिचं नाव ललिता कायी कुमार असून ती मानसिक आजार आहे. त्यामुळे तिने पत्रात केलेल्या दावाबद्दल पोलीस तपास करत आहे. दरम्यान या महिलेचा नवरा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 
ललिता ही उच्च शिक्षित असून अमेरिकेत प्रसिद्ध बेली डान्सर आणि योग शिक्षक होती. पुढील योगाचे शिक्षण घेण्यासाठी ती 10 वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडूमध्ये आली होती. तामिळनाडूमधून ती महाराष्ट्रातील सांवतवाडीमधील जंगलात कशी पोहोचली याचा तपास सुरु आहे. 

 

Read More