Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबईत दुकाने उघडण्याचे हे नियम, पण तरीही मुंबईत आजपासून सर्व दुकाने उघडली

राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्ण कमी आहेत, त्या भागात सरकारने काही सवलती दिल्या आहेत.

मुंबईत दुकाने उघडण्याचे हे नियम, पण तरीही मुंबईत आजपासून सर्व दुकाने उघडली

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुऴे महाराष्ट्रात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर 15 दिवस करत लॉकडाऊन वाढतच गेला. परंतु मे महिन्याच्या शेवटी कोरोनाचे केसेस कमी झाल्यामुळे लोकांना आशा होती की, जूननंतर तरी, हा लॉकडाऊन संपेल. परंतु त्यानंतर आता हा लॉकडाऊन आणखी 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु यामध्ये चांगली गोष्ट अशी की, राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्ण कमी आहेत, त्या भागात सरकारने काही सवलती दिल्या आहेत.

मुंबईत देखील रुग्ण संख्या कमी असल्याने मुंबईत काही सवलती दिल्या गेल्या आहेत. मुंबईतील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवतांना मुंबई महानगरपालिकेने सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. विषम-सम सूत्रानुसार दुकाने आठवड्यातून पाच दिवस उघडतील.

बीएमसीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत खुली राहतील आणि त्याशिवाय ज्या वस्तू अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित नाहीत, अशा दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन बीएमसीने या बद्दलची माहिती दिली.

मुंबईत सध्या दररोज सुमारे 30 हजार लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. पाच टक्के पेक्षा कमी लोकं चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यामुळेच महापालिकेने सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

परंतु कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्यामुळे सामाजिक अंतर, मुखवटे वापरने यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली जाईल. याबाबत पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईत दुकाने उघडण्याचे हे नियम

पहिल्या आठवड्यात मुंबईतील रस्त्यांच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी आणि डावीकडील दुकाने मंगळवारी, गुरुवारी उघडतील.

तर दुसर्‍या आठवड्यात, डावीकडील दुकाने सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उघडतील आणि उजवीकडील दुकाने मंगळवारी आणि गुरुवारी उघडतील.

Read More