Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार

Maharashtra Karnataka border  : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला. 

Maharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार

Maharashtra Karnataka border issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला आहे. (Maharashtra Political News) कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आला आहे. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करु असं सांगण्यात आले. (Maharashtra Karnataka border) मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला. 

आम्ही सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठाम आहोत. (Maharashtra Karnataka border issue) एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, असा ठराव मंजूर केला जाईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले होते. परंतु सरकार काहीही हालचाल करताना दिसत नाही. गप्पच आहे, असे अजित पवार म्हणाले.  दरम्यान, महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकार आणणार आहे. त्यामुळे सीमावाद चिघळण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यानंतर याचे पडसाद नागपूरमधील हिवाळी अधिवेशना उमटलेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

आम्ही सीमाभागातल्या मराठी भाषिकांच्या पाठिशी - पवार

सीमाभागातल्या मराठी भाषकांच्या पाठिशी आपण ठाम उभे आहोत. एकएक इंच जमीन महाराष्ट्रात आली पाहिजे, असा ठराव दोन्ही सभागृहात मंजूर केला जाईल असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. तर राज्यात कर्नाटकहूनही भक्कम ठराव मांडला जाईल उत्पादनशुल्क मंत्री आणि समन्वय समितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सीमावादाचा मुद्दा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत मांडला आहे. त्यामुळे पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागेल आहे.

चीनने भारतात प्रवेश केला तसा कर्नाटकात प्रवेश करु - राऊत

Sanjay Raut on Maharashtra Karnataka border issue  : सीमावादावर कारवाई न केल्याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी बुधवारी मुख्यमंत्री शिंदे हे का गप्प आहेत. त्यांना कशाची भीती वाटत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत आहेत. सातत्याने भाष्य करत आहेत. एक इंच जागा देणार नाही, असे सांगत महाराष्ट्र विरुद्ध ठराव आणत आहेत. मात्र, आपले मुख्यमंत्री गप्पच आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. तुम्ही गप्प बसलात तरी आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. ते म्हणाले, चीनने भारतात प्रवेश केला तसा कर्नाटकात प्रवेश करु. चीन ज्या पद्धतीने भारतीय हद्दीत घुसला आहे त्याच पद्धतीने विरोधक कर्नाटकात घुसू शकतात, असा त्यांनी यावेळी इशारा दिला.

'महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत सरकार'

दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार चीनला एक इंचही जमीन देणार नाही, असे सांगत आहे. मात्र चीन भारतीय हद्दीत घुसखोरी करत आहे. चीनप्रमाणे आम्हीही कर्नाटकच्या सीमा भागात प्रवेश करु.आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. पण हा एकसंध देश आहे आणि आम्हाला शांतता राखायची आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणूनबुजून या वाद वाढवत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात अत्यंत कमकुवत सरकार आहे, असा आरोप राज्यसभा खासदार राऊत यांनी केला.

Read More