Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

MPSC Exam News : राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. 

MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई : MPSC Exam News : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra State Public Service Commission) गेली दोन वर्षे परीक्षा होऊ शकली नाही, अशा पदांच्या परीक्षांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल चर्चा झाली. एमपीएससीमार्फत (MPSC) पदभरतीसाठी परीक्षेची जाहिरात तब्बल दोन वर्षांनंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ( Maharashtra - Important news for students appearing for MPSC exams)

कोरोनामुळे परीक्षा वारंवार रद्द करण्यात आली होती. उमेदवारांनी त्यासाठी बरीच तयारीदेखील केली. मात्र परीक्षाच न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली. ही वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि अन्य काही मंत्र्यांनी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मागणी केली. 

आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा 38 वर्षे आहे तर अन्य राखीव उमेदवारांसाठी ती 43 वर्षे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात विधी व न्याय विभागाचे मत मागवावं आणि पुढील बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहे. 

Read More