Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची आतापासूनच तयारी

 तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची आतापासूनच तयारी 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची आतापासूनच तयारी

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) राज्यासह देशासाठी महागात पडतेय. पहिल्या लाटेनंतर कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्यानंतर दुसरी लाट इतरी भयानक येईल असा कोणी विचार केला नव्हता. पण सध्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसह रेमडीसीवीर इंजेक्शनचा (remedisivir Injection) तुटवडा जाणवतोय. कोरोनामुळे होणारा मृत्युदर देखील वाढतोय. दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी (Corona third Wave) राज्य सरकारची (Maharashtra Government) आतापासूनच तयारी सुरू आहे. 

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट अपेक्षित आहे. यापूर्वी राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. अन्यथा तिसऱ्या लाटेत नागरिकांना अजून फटका बसू शकतो अशी भीती वर्तवण्यात येतेय.

दुसर्‍या लाटेचा सध्या सरकार घेत असलेला अनुभव लक्षात घेता राज्य सरकार आतापासून तिसर्‍या लाटेला तोंड देण्याच्या तयारीला लागले आहे. तिसऱ्या लाटेत राज्य सरकार ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे हे सरकारचे टार्गेट आहे. 

येत्या एक दीड महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारण आठ ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे टार्गेट आहे. हे प्लांट तयार झाले तर राज्यात अधिकचा 350 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होईल असं सांगण्यात येतंय. 

याशिवाय राज्य सरकारने रेमडीसीविर, ऑक्सिजन स्टोरेज टॅंक, ऑक्सिजन याबाबत ग्लोबल टेंडर काढले आहे. सप्टेंबरपर्यंत जास्तीत जास्त लसीकरण आणि ऑक्सिजन पूर्तता या दोन आघाडीवर राज्य सरकारचे जास्त लक्ष आहे.

Read More