Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'मातोश्री' आणि 'सिल्व्हर ओक'वर हालचालींना वेग

'मातोश्री' आणि 'सिल्व्हर ओक'वर हालचालींना वेग 

'मातोश्री' आणि 'सिल्व्हर ओक'वर हालचालींना वेग

मुंबई : आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात आहे. शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करु शकते आणि काँग्रेस त्यांना बाहेरून पाठींबा देईल अशी माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. तुर्तास राज्यातील राजकारण वेगाने वळण घेत आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' आणि शरद पवार यांचे निवासस्थान 'सिल्व्हर ओक'वर हालचालींना वेग आहे. 

भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या पारड्यात महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. शिवसेना नेते संजय राऊत गेले १५ दिवस भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. भाजपाने दिलेला शब्द पाळला नसल्याचे ते म्हणत आहेत. 

राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटले. प्रफुल्ल पटेल यांच्या केंद्रातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबध आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांशी बोलून हा निरोप घेऊन ते आले आहेत का ? अशी चर्चा होत आहे. 

Read More