Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Coronavirus : 'या' नियमांसह राज्यात लॉकडाऊन वाढला

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची घोषणा   

Coronavirus : 'या' नियमांसह राज्यात लॉकडाऊन वाढला

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं वाढणारी coronavirus कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्य शासनाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 31 म्हणजेच या वर्षअखेरीपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असणाऱ आहे. थोडक्यात 2020 हे वर्ष Lockdown लॉकडाऊननंच संपणार आहे.

हा लॉकडाऊन राज्यात असणाऱ्या सर्व कंटेन्मेंट झोनमध्य असणार आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'मिशन बिगिन'अंतर्गत काही निर्बंध शिथिल करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं सप्टेंबर 30 आणि ऑक्टोबर 14 रोजी लागू करण्यात आलेले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वं हे यापुढंही लागू असणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत या नियमांसह राज्याच लॉकडाऊन आणि unlock अनलॉक अशा दोन गोष्टी आता सुरु आहेत त्याच पद्धतीनं सुरु राहतील. 

प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनमध्ये असणारे नियम पाळणं सक्तीचं असेल. ज्यामुळं कोरोना नियंत्रणात आणण्यात मोठी मदत होणार आहे. परिणामी कंटेन्मेंट झोनमध्ये असणारा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्याचं कळत आहे. 

 

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असतानाच वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आणण्याचं आवाहनही राज्य शासनापुढं आहे. राज्य शासनानं आतापर्यंत ई पास रद्द करत आणि राज्यांतर्गत प्रवासाला मुभा देत सुरुवातीला कोरोना काळात मोठे निर्णय घेतले. त्यामागोमाग रेल्वे सेवेतही काही निम शिथिल करण्यात आले. मॉल, दुकानं सुरु करण्यामागोमागच काही दिवसांपूर्वी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरंही सशर्त सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व सवलती आणि सुविधा ठरलेल्या नियमांप्रमाणे कायम असणार असल्यामुळं नागरिकांसाठी हा मोठा दिलासा असेल.  

 

Read More