Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाराष्ट्र ATS ला हवा सचिन वाझेंचा ताबा! हत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच...

महाराष्ट्र  एटीएसने हसमुख हिरेन हत्या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र ATS ला हवा सचिन वाझेंचा ताबा! हत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीतच...

मुंबई : राज्यातील राजकारण ढवळून काढणारे हसमुख हिरेन हत्या प्रकरणातील चौकशी कुठवर आली. याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र एटीएसकडून देण्यात आली आहे. आजपर्यंत झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र एटीएसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
 

 दिनांक 6 मार्च 2021 मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास  सुरू झाला होता.  एटीएसने मनसुख यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला. जबाबामध्ये त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खुन केला असावा असे सांगितले. 
 
 याप्रकरणी संगनमताने खुन केल्याचा आणि खुनाचा कट रचल्याचा गुन्हा नोंदवल्यात आला. तपासात सचिन वाझे यांनी माझा मनसुखशी कोणताही संबध नसल्याचे सांगितले. असे एटीसने सांगितले.
 
 एटीएसने सचिन वाझे पुर्णतः खोटं बोलत असल्याचे सबळ पुरावे गोळा केले आहेत. सचिन वाझे यांचा मनसुखच्या हत्येत सक्रिय सहभाग होता. 
 
 प्राथमिक चौकशीत नरेश गोर याने विनायक शिंदे यांच्याकडे दिलेले सिम कार्ड वाझे यांच्या सांगण्यावरून देण्यात आले होते. हे स्पष्ट झाले आहे. नरेश आणि विनायक या दोघांना एटीएसने अटक केली आहे.
 
 विनायक शिेंदे पॅरोलवर असलेला माझी पोलीस कर्मचारी आहे. मनसुख हिरेनला बोलावून घेणे आणि त्याची हत्या करणे. यात विनायकचा स्पष्ट सहभाग आहे. 
 
 एटीएसने दमनवरून एक व्हॉल्वो कार जप्त केली आहे. तिचाही तपास सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक होऊ शकते. 
 
 आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही पुरावे नष्ट केल्याचे समोर आले आहे. सचिन वाझे यांची आणखी चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे एनआयएकडून सचिन वाझेंचा ताबा घेण्यासाठी एटीएस प्रयत्न करीत आहे.

Read More