Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Vijay Shivtare meet Anantrao Thopate : शरद पवार याचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतल्याने बारामतीचं वारं फिरणार का? असा सवाल विचारला जात आहे.

1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव कुणी केला? शरद पवारांविरोधात विजय शिवतारेंची तिरकी चाल!

Baramati Lok Sabha Election : बारामतीच्या राजकारणात आता अनेक राजकीय घडामोडी (Baramati LokSabha) घडताना दिसत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) अशी फाईट फिक्स असली तरी बारामतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दंड थोपटले आहे. मी वैयक्तिकपणे अजित पवारांना माफ केलंय. पण अजितदादांची गुरमी जाणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघावर कोणाचा सातबारा नाही असं म्हणत विजय शिवतारेंनी पवार कुटूंबियांविरोधात रणशिंग फुंकलंय. अशातच आता विजय शिवतारेंनी तिरकी चाल खेळली आहे. शरद पवारांचे विरोधक असलेल्या काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांची शिवतारेंनी घरी जाऊन भेट घेतली. जुन्या गोष्टी विसरू नका अन् मला साथ द्या, असं म्हणत शिवतारेंनी थोपटेंना पाठिंबा मागितला आहे. 

विजय शिवतारे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची घरी जाऊन भेट घेतली. दरम्यान, शिवतारे यांनी 1999 च्या पराभवाची आठवण अनंतराव थोपटे यांना करून दिली. तुमचं मुख्यमंत्रीपद जाण्यास जबाबदार कोण आहे? याची आठवण विजय शिवतारे यांनी करून दिलीय. शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुमचा पराभव केला होता. अजित पवारांनी आपली लायकी काढली होती. दुश्मनी बाजूला राहिली, पण भोरची जनता पवारांना मतदान करणार नाहीत. त्यामुळे मी निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे तुमचा मला आशीर्वाद द्या, असं साद शिवतारेंनी अनंतराव थोपटेंना घातली आहे.

बारामतीत फक्त पवारच का?, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून जनतेने मला साद द्यावी, असं विजय शिवतारेंनी म्हटलं आहे. एकीकडे पवारांची सुन लढतीये, तर दुसरीकडे पवारांची लेक, तर शिवतारे देखील मैदानात आले आहेत. त्यामुळे आता कोणाला पाठिंबा देयचाय, यावर आम्ही विचार केला नाहीये, असं अनंतराव थोपटे यांनी म्हटलं आहे.

थोपटे विरुद्ध पवार

दरम्यान, 25 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अनंतराव थोपटे मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुकीत होते. त्यावेळी थोपटेंनी सोनिया गांधी यांनी भोरमध्ये रॅली आयोजित केली होती. मात्र, शरद पवारांनी काँग्रेसशी किनारा करून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी दिली अन् अनंतराव थोपटेंचा पराभव केला. तेव्हापासून अनंतराव आणि शरद पवार यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली अन् बारामतीच्या राजकारणाला नवं वळण दिलं आहे.

Read More