Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाबळेश्वरही दाट धुक्यात हरवून गेले, नागपूर-नाशिकचा पारा घसरला

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरही आज दाट धुक्यात हरवून गेले.  

महाबळेश्वरही दाट धुक्यात हरवून गेले, नागपूर-नाशिकचा पारा घसरला

सातारा : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वरही आज दाट धुक्यात हरवून गेले. त्यामुळे पर्यटकसुद्धा या धुक्यात फिरण्याचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंट, वेण्णा लेक आणि शहरातील अनेक भागात धुक्याची चादर पसरली आहे. दोन दिवसांपासून थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. थंडी नसल्याने काहीसा हिरमोड झालेले पर्यटक आता मात्र, या थंडीचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

नागपूरकरांना हुडहुडी

नागपुरात पारा ५.१ अंशांपर्यंत घसरलाय. यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झालीय. त्यामुळे नागपूरकरांना हुडहुडी भरलीय. दोन दिवसांपूर्वी नागपुरात पाऊस पडला होता. त्यानंतर शहरात गारठा वाढलाय. थंडीचा जोर चांगलाच वाढलाय. त्यामुळे नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागतोय. स्वेटर घातल्याशिवाय नागरिकांना बाहेर पडणंही अवघड होतंय. 

पारा ११ अंशांवर घसरला

नाशिकमध्ये पारा ११ अंशांवर घसरलाय तर निफाडचा पारादेखील १५ अंशावर आलाय. या थंडीमुळे नाशिककरांमध्येही उत्साह आहे. गुलाबी थंडीचा आनंद नाशिककरही लुटत आहेत. महाराष्ट्रात थंडीचं आगमन उशिराने झाले आहे. मात्र सर्वात आधी तापमानानं निचांक गाठलाय तो खान्देशात. धुळ्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय. धुळ्यात पारा ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलाय. काल जळगावमध्येही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. 

तापमानात झाली घट

नंदुरबार जिल्ह्याचा तापमानाचा पारा खाली घसरला आहे. गेले काही दिवस ढगाळ वातावरण असताना अचानक तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीची हुडहुडी चांगलीच वाढलीय. या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. तर वाढत्या थंडीमुळे शहरी भागातील जनजीवन काही अंशी विस्कळीत झालंय. 

गुलाबी थंडीला सुरुवात

देशभरात आता गुलाबी थंडीला सुरुवात झालीय. उत्तर भारत थंडीने गारठलाय. तर राज्यातही आता थंडीचं आगमन झालंय. नागपूरचा पारा पाच अंशांपर्यत घसरलाय. नागपुरात यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झालीय. तर उत्तर महाराष्ट्राही थंडीने गारठलाय. धुळ्यचा पारा ६ अंशांवर घसरला आहे. तर नाशिकमध्येही कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. तर पुणे, मुंबईकरांना अजूनही थंडीची प्रतिक्षा आहे. पुणे, मुंबईत म्हणावी तशी थंडीला सुरुवात झालेली नाही. 

Read More