Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीची महाआरती; मंदिरात ६२ किलोचा मोदक अर्पण

महाआरती निमित्ताने दगडूशेठ गणपतीला ६२ किलोचा केशरी मोदक अर्पण करण्यात आला आहे

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीची महाआरती; मंदिरात ६२ किलोचा मोदक अर्पण

कुणाल जमदाडे, झी मीडिया, पुणे : शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शिवसैनिकांकडून महाआरती करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरती पार पडली आहे. पुणे शहर आणि जिल्हा शिवसेनेकडून ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीला ६२ किलोचा केशरी मोदक अर्पण करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सकाळी मंदिरात अभिषेकही करण्यात आला असून उद्धव ठाकरे यांना उत्तम स्वास्थ्य लाभाव यासाठी प्रार्थना करण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या काळात यश मिळावे, तसेच राज्याच्या विकास त्यांच्या हातून होवो. देशाची सेवा करण्यासाठी देवाने शक्ती आणि युक्ती दोन्ही द्यावी, अशी प्रार्थना दगडूशेठ गणपतीच्या चरणी करण्यात आली.

गणपतीच्या आगमनाआधी शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रासह हिंदुस्तानावर फडकू दे - उद्धव ठाकरे

दरम्यान, रविवारी एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी गणपतीकडे महाराष्ट्रावरील संकट लवकर संपू दे असे साकडं घातलं होतं.

"लवकरच गणपती बाप्पा येत आहे. मी गणपतीला साकडं घालत आहे की, तुझ्या आगमनाच्या आधी हे संकट पूर्ण तोडून शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रासह हिंदुस्तानावर फडकू दे. कारण खरा भगवा कोणता आहे हे दाखवून देण्याची गरज आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Read More