Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

सलग चार सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा

मुंबई : सलग चार सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मौजमजा करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बोरघाटात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. त्यामुळे प्रवास अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर आता जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तो टाळा, अन्यथा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागेल, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.

चौथा शनिवार आणि मंगळवार १ मे पर्यंत सलग चार दिवस सुटी आल्याने फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. लोणावळाजवळ वाहतूक कोंडी झाली असून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

त्यातच काही शाळांचे निकाल लागल्याने उन्हाळाची सुटी सुरु असल्याने अनेकांनी चार दिवस सहकुटुंब भटकंतीसाठी बाहेर जाण्याचे बेतही आखले आहेत. मात्र, शनिवारी सकाळी बाहेर पडलेल्या प्रवाशांचा वाहूतक कोंडीमुळे हिरमोड झालाय. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. लोणावळा तसेच अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे.

Read More