Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'त्यांना सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय..' निलेश लंकेंच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल

Nilesh Lanke on Police:  महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत.

'त्यांना सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय..' निलेश लंकेंच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल

Nilesh Lanke on Police: राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. या भाषणातून जनतेला आश्वासन, विरोधकांवर टीका सुरु आहे. यात नेते आपल्या कार्यकर्त्यांनाही प्रचंड प्रमाणात जपताना दिसत आहेत. याचीच प्रचिती निलेश लंकेंच्या भाषणातून आली. भरसभेत 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत. शरद पवार यांच्या शेवगाव येथील सभेत भाषणाच्या सुरुवातीलाच निलेश लंके यांनी पोलिसांचा चांगला समाचार घेतला. काही पोलीस आलेल्या कार्यकर्त्यांना खाली बसण्यासाठी सांगत होते. त्यावेळी निलेश लंके यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांना थांबवले आणि त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. 

पोलीस डिपार्टमेंट आमच्या कार्यकर्त्यांना खूप त्रास देत असून 13 तारखेनंतर सगळ्यांकडे पाहून घेऊ अशी भाषा वापरली होती. तर अहमदनगर मधील एका हॉटेलमधून निलेश लंके यांच्या कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी 60 हजार रुपयांची रक्कमेसह ताब्यात घेतले होते. ही माहिती निलेश लंके यांना कळाली होती. 

यानंतर निलेश लंके यांनी सभास्थळी मतदारांसमोर संताप व्यक्त केला. सत्ताधारी उमेदवार सर्व प्रशासनाचा वापर करून त्रास देत आहेत. हे सांगत असताना डिपार्टमेंटचे कुणी असेल तर त्याला  निरोप द्या, दहा मिनिटात तुमचा बाप येत आहे. अशी भाषा निलेश लंकेंनी वापरली होती. त्यामुळे सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Read More