Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Loksabha Election 2024 : महायुतीतील 'त्या' 7 जागांचा तिढा सुटला? लवकरच उमेदवारांची होणार घोषणा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यातील 7 जागांसाठी महायुतीत अजून रस्सीखेच सुरु आहे. आज आणि उद्यामध्ये उमेदवार जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

Loksabha Election 2024 : महायुतीतील 'त्या' 7 जागांचा तिढा सुटला? लवकरच उमेदवारांची होणार घोषणा

Maharashtra Politics News in Martahi : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. राज्यातील तापमानासोबत निवडणुकीचं राजकीय तापमानही तापत चाललंय. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील इतक्या दिवसांपासून सुरु असेलला सात जागांचा तिढा अखेर सुटल्याच बोलं जातंय.  महायुतीमधील भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाकडून एकमेकांच्या जागावर दावा करण्यात येतोय. आज किंवा उद्यामध्ये या जागाचा उमेदवार घोषित करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलंय.  (Loksabha Election 2024  nashik thane and south mumbai candidates those 7 seats Candidates mahayuti will be announced soon)

महायुतीत ठाणे, पालघर, नाशिक कोणाकडे जाणार हे ठरत नसल्याने हा तिढा वाढत होता. मुंबईतील सहा जागापैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. या जागेवर शिवसेने उमेदवार जाहीर केलाय. दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर या दोन जागेवरील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. ठाणे, नाशिक, पालघर, कल्याण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण या जागांवर उमेदवारीचा पेच आहे. महायुतीच्या याच हायव्होल्टेज मतदारसंघाचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि नाशिक मतदारसंघांवर शिवसेनेचा दावा कायम आहे तर पालघर आणि दक्षिण मुंबईवर भाजपनं दावा केलाय..

नाशिकमध्ये महायुतीचे इच्छुक सैरभैर 

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर होत असल्याने महायुतीचे इच्छुक सैरभैर झालेत. विद्यमान खासदार आणि सध्याचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंनी शुक्रवारी तुळजापुरात दर्शन घेतलं तर त्यांचा मुलगा आणि सुनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेत गोडसेंना तिकीट देण्याचा आग्रह धरला. गोडसेंना तिकीट मिळत नसल्यास किमान सुनेला तिकीट द्यावे अशी आग्रही मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे मुंबईमध्ये आहेत. तिथे मविआ उमेदवार राजाभाऊ वाजे आणि शांतीगिरी महाराजांनी प्रचार सुरु केलाय.

 

Read More