Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबईत युतीचे सध्याचेच खासदार रिंगणात, किरीट सोमय्यांचा अपवाद ?

आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही हे ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी जाहीर केले आहे. 

मुंबईत युतीचे सध्याचेच खासदार रिंगणात, किरीट सोमय्यांचा अपवाद ?

अमित जोशीसह कृष्णात पाटील, झी २४ तास मुंबई : निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर सेना भाजपाच्या युतीने आपली मोटबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 25 तर शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. मोठ्या नेत्यांमध्ये संगनमत झाले असले तरी ते कार्यकर्त्यांपर्यंत अजूनही पोहोचलेले दिसत नाही. युती जाहीर करण्याआधी एकमेकांविरोधात उभे असलेल्या सेना भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. यांना सावरणे हे युतीच्या नेत्यांसमोरचे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत आम्ही किरीट सोमय्यांचा प्रचार करणार नाही हे ईशान्य मुंबईच्या शिवसैनिकांनी जाहीर केले आहे. त्यामुळे युती या सर्वावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. 

fallbacks

मुंबईतल्या लोकसभा जागांवर शिवसेना आणि भाजपा सध्याच्याच खासदारांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. अपवाद फक्त किरीट सोमय्यांचा असू शकतो. मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ असून दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ३ मतदारसंघ आहेत. पुढील पाच वर्षे तुला चौपट काम करायचंय असे उद्धव ठाकरे यांनी राहूल शेवाळे यांना उद्देशून म्हटले. अशी स्तुती करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची पहिली उमेदवारी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून पुन्हा राहूल शेवाळेंना जाहीर केली. या मतदारसंघातून शिवसेनेचे दुसरे कुणीच इच्छूक नसल्याने अपेक्षेप्रमाणे राहूल शेवाळेंच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडणार होती.  दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार अरविंद सावंत तर उत्तर पश्चिममधून खासदार गजानन किर्तीकर यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते. 

fallbacks

भाजपही आपल्या सध्याच्या खासदारांनाच संधी देण्याची शक्यता असली तरी किरीट सौमय्यांबाबतचे पत्ते अजूनही भाजपनं उघडलेले नाहीत.  उत्तर मुंबईतून खासदार गोपाळ शेट्टी आणि उत्तर मध्य मुंबईतून खासदार पूनम महाजन यांनाच उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु शिवसैनिकांच्या विरोधामुळे ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांच्या उमेदावारीबाबत अद्यापही भाजपचे तळ्यातमळ्यात सुरू आहे.

मुंबईत एकीकडे शिवसेना भाजपचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या दक्षिण मुंबईचा आणि राष्ट्रवादीच्या ईशान्य मुंबईचा अपवाद वगळता इतर मतदारसंघात तगड्या उमेदवारांसाठी शोधाशोध सुरू आहे. 

Read More