Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

लोकसभा निवडणूक : उदयनराजेंच्या प्रचारासाठी महाआघाडीचे दिग्गज मैदानात

एकीकडे कोल्हापुरात महायुतीची सभा होत असताना कराडमध्ये काँग्रेस महाआघाडीची सभाही होणार आहे.

लोकसभा निवडणूक : उदयनराजेंच्या प्रचारासाठी महाआघाडीचे दिग्गज मैदानात

कराड : एकीकडे कोल्हापुरात महायुतीची सभा होत असताना कराडमध्ये काँग्रेस महाआघाडीची सभाही होणार आहे. प्रामुख्याने खासदार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी होत असलेल्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 

उदयनराजेंच्या उमेदवारीला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचा विरोध होता. उदयनराजेंनी या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन विरोध कमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला कितपत यश आलंय हे आजच्या सभेत समजेल.

Read More