Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत

 वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव झाला आहे.  प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले आहेत. 

महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल! वंचितच्या सर्वच्या सर्व 35 उमेदवारांचा पराभव; प्रकाश आंबेडकरही पराभूत

Lok Sabha Election Results 2024 Live :  राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला. या निकालात आज अनेक मोठे बदल दिसून आले. महाराष्ट्रात तर महायुतीची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. महायुतीला 18 तर मविआला 29 जागा मिळाल्या. त्यामुळे मविआचा हवा असल्याचे दिसून आलं. परंतु, मविआचा आकडा आणखी वाढलेला दिसून आला असता मात्र, वंचितसोबत नसल्यामुळे वंचितच्या उमेदवारांमुळे मविआला थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसलं.  वंचित बहूजन आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झालाय. प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले आहेत. महाष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकाल मानला जात आहे. पराभव झाला असला कतरी अनेक मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारीचा इतर उमेदवारांना फटका बसला. 

वंचितच्या उमेदवारांचा कुणाला फटका? 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा सुफडा साफ झालाय. वंचितने 48 पैकी 35 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्या सर्व उमेदवारांचा पराभव झालाय. अनेक ठिकाणी तर वंचितच्या उमेदवारांना 5 ते 10 हजाराचा मतांचा टप्पाही पार करता आला नाहीय..  तर काही ठिकाणी मात्र  वंचित च्या उमेदवारीचा इतर उमेदवारांना मोठा फटका बसला. 

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा वंचित- मविआची होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण जागा वाटपावरून ही युती बिनसली. पण त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी निवडणुकीत उमेदवार जाहीर केले. तर प्रकाश आंबेडकर स्वत: उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परंतु आजच्या निकालातून मोठे धक्कादायक आकडे समोर आले. वंचितने उभे केलेले सर्व उमेदवार पराभूत झाले तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांचा देखील पराभव झाला आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत ठाकरेंची शिवसेना वरचढ 

शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाईत ठाकरेंची शिवसेना वरचढ ठरलीय...13 लोकसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढाई झाली होती...या 13 पैकी 8  जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेयत...तर 6 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेयत...त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी बाजी मारलीय...

 

Read More