Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर

Loksabha Election 2024: निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न विचारला जातोय.

गावागावात फिरतायत शासनाच्या जाहिराती, एसटी महामंडळाला आचारसंहितेचा विसर

Loksabha Code of Conduct: महाराष्ट्रासह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याचसोबत आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते सरकारी आस्थापनांनी याचे पालन करणे अपेक्षित असते. पण अनेकदा सरकारी आस्थापनांना याचा विसर पडल्याचे दिसून येते. अकोल्यामध्ये असेच दृश्य दिसून आले आहे. निवडणुका तोंडावर असताना काय घडलाय प्रकार? जाणून घेऊया

अकोला पश्चिम विधानसभेत आगामी लोकसभा तसेच पोट निवडणुकीची तयारी सुरु आहे. अकोला जिल्हासह रिसोड मतदार संघात 16 मार्च पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता सुरु असताना विविध राजकीय पक्षाचे बॅनर, फ्लॅक्स, तसेच राजकीय पुढाऱ्यांचे बोर्ड काढणे किंवा झाकणे आवश्यक असते. पण असे होताना येथे दिसत नाही. त्यामुळे अकोला महानगरपालिका तसेच नगरपालिकेने यावर कारवाईचा बडगा उगारलाय. 

प्रत्येक विभागाला शासनाच्या जाहिराती आणि प्रसिद्धी करणारे फलक झाकणे बंधनकारक आहे. असे असताना राज्य मार्ग परिवहन विभागाला कोड ऑफ कंडक्टचा विसर पडला असल्याचा दिसून येत आहे.

..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, शिवतारेंचा हल्लाबोल 

अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बहुतांश एसटी बसवर शासनातर्फे राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या जाहिराती अध्यापही फिरत आहेत.  या प्रकारामुळे एसटी प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे दिसून येत आहेय. 

निवडणूक आयोगाकडून एसटी विभागाला आचारसंहितेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्या की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय.

मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर अडवा- उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Read More