Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत अजुनही निर्णय होत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि विद्यमान राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे अस्वस्थ झाले आहेत. भाजप या मतदारसंघाबद्दल काहीच भूमिका घेत नसल्याने तसेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यात जमा झाल्याची चर्चा आता सुरु झाल्याने सदाभाऊ खोत नाराज झाल्याची चर्चा आहे. या मतदार संघात आपल्या संघटनेचे चांगले काम आहे. तसेच जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे किमान लोकसभेची एक जागा ती सुद्धा हातकणंगलेची हवी, असा आग्रह सदाभाऊ खोत यांचा आहे. भाजपकडून मित्रपक्षांसाठी जागा सोडण्याबाबत बोलणी झालेली नाही. त्यामुळे सदाभाऊ नाराज असल्याचे समजते.

गेल्या तीन वर्षात मंत्री झाल्यावर या हातकणंगले मतदारसंघात अनेक विकास कामे मार्गी लावली. शेतक-यांच्या समस्या मार्गी लावल्या असल्याचा दावा खोत करत आहेत. शेतकरी संदर्भातल्या त्यांच्या चळवळीची सुरुवातही याच भागातून झाली आहे. शिवसेनेचे आमदार सोडले तर सेनेचे काहीही अस्तित्व नसल्याने हा मदतारसंघ आपल्याचा मिळावा, असा खोत यांचा हट्ट आहे. 

दरम्यान, शिवसेा - भाजप युती झाल्याने भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात येण्याची शक्यता असल्याने सदाभाऊ खोत अस्वस्थ आहेत. भाजपने मित्र पक्षांना किती जागा सोडणार याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेला लोकसभेची जागा मिळणार का, याचीच जास्त उत्सुकता आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत हे एका जागेवर आग्रही आहेत. त्यांना हातकणंगलेची  जागा हवी आहे. मात्र, निर्णय होत नसल्याने ही जागा कोणाला मिळार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read More